Header Ads

सिझेरियन पद्धतीबाबत हे ’5′ गैरसमज आजच दूर करा !

सिझेरियन पद्धतीबाबत हे ’5′ गैरसमज आजच दूर करा !

प्रसुतीवेदनांचा त्रास टाळण्यासाठी Cesarean Surgery चा पर्याय निवडत असल्यास या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या सी सेक्शन हा मुळीच सोपा पर्याय नाही

नॉर्मल डिलेव्हरीचा त्रास, वेदना किंवा भीती टाळण्यासाठी जर तुम्ही सी सेक्शनचा पर्याय निवडत असाल तर पुन्हा विचार करा. सी सेक्शन हा मूळीच सोपा पर्याय नाही. अनेकांना हे केवळ एक ऑपरेशन वाटते. मात्र तसे नसून यामध्येही काही धोके आहेत. तसेच सी सेक्शननंतर केवळ बसायला 24 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनेकदा जन्मानंतर लगेजच बाळाला जवळ घेता येत नाही.

2. रिकव्हरीसाठी सहा आठवड्यांहून अधिक काळ लागतो

सी सेक्शन म्हणजे गर्भाशयापर्यंत त्वचेचे अनेक स्तर छेदून केलेले एक ऑपरेशन असते. त्यामुळे टाके सुकून जखम भरायला सहाजिकच खूप वेळ लागतो. सुमारे सहा आठवड्यांचा कालावधी सांगितला असला तरीही तुमचे रूटीन पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी त्यापेक्षाही अधिक काळ लागतो. पूर्णतः वेदनारहीत होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा काळ लागतो.

3. सी सेक्शनचा त्रास थोडा सुकर करता येऊ शकतो

नॉर्मल म्हणजेच व्हजिनल डिलेव्हरीपेक्षा सी सेक्शन आई आणि बाळासाठी केवळ त्रासदायकच असतो असे मानणार्‍यांचा हा केवळ गैरसमज आहे. हा पर्याय त्रासदायक वाटत असला तरीही बाळाच्या जन्मावेळी काही गर्भसंस्काराची सीडी किंवा श्लोक लावल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच लाईट्स थोडे मंद ठेवण्याची सूचना करा.

4. सी सेक्शनने जन्माला येणारे बाळ कमी बुद्धीवान, तापट आणि दंगेखोर असते

बाळाच्या जन्माला येण्याच्या पद्धतीवर त्याची बुद्धिमत्ता, स्वभाव मूळीच अवलंबून नसतो. बाळाच्या जन्मानंतर त्याची वाढ होताना परिवारातील, आजूबाजूच्या परिस्थिती यामधून बाळ खूप गोष्टी शिकत असते. त्यामुळे त्यावरच बाळाचा स्वभाव अवलंबून असतो. त्यामुळे सी सेक्शनच्या पर्यायाने त्यावर कोणताही परिणाम होत नाही.

5. आई-बाळाच्या नात्यावर परिणाम होतो -

आई-बाळाचे नाते खूपच आगळेवेगळेअसते. इतरांपेक्षा आई बाळाला 9 महिने अधिक चांगले ओळखते. त्यामुळे बाळाचा लळा, त्याच्यावरील प्रेम ते कोणत्या प्रकारे जन्माला आले यावर मूळीच अवलंबून नसते. पुरेशी माहिती नसल्याने किंवा सी -सेक्शन पद्धतीची भीती वाटत असल्याने काही चूकीचे समज-गैरसमज समाजात पसरवले जातात. त्यामुळे निष्कर्ष काढण्याआधी तुमच्या गायनकॉलॉजिस्टला वेळीच भेटून योग्य पर्यायाची निवड करा.

Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.

Previous Article

या '7' संकेतांवरून ओळखा त्याचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट्स तुम्हांला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न आहेत

Powered by Blogger.