Header Ads

स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !

स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !

वयानुसार आणि शरीरात होणार्‍या बदलांनुसार स्त्रीयांच्या Breast मध्ये होतात नैसर्गिकरित्या बदल !

1. पौगंडावस्था

मुली  वयाच्या येण्याच्या काळात त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. प्युबिक हेअरपासून काखेतील केस वाढण्यास मदत होते. यावेळी ब्रेस्टवर निपलजवळ लहान बम्प ( पुळीच्या आकारासारखे) येतात. यासोबतच पाळीच्या दिवसात  ब्रेस्ट अधिक जाड आणि संवेदनशील होतात. 9-11 वयात शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सच्या निर्मिती आणि प्रवाहामध्ये बदल होतात. estrogen, progesterone आणि prolactin या सारख्या हार्मोन्समुळे ब्रेस्टची वाढ आणि आकार बनण्यात मदत होते.

2.गर्भारपणाचा काळ

मुली वयात आल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गरोदरपणाचा काळ! गरोदरपणाच्या काळामध्येही शरीरात अनेक बदल होत असतात. पहिल्या तिमाहीच्या काळात स्त्रियांचे ब्रेस्ट अधिक जाड होतात. या काळात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्या पातळीमध्ये वाढ होते. ब्रेस्ट्चे आकार वाढतात. सोबतच त्याला खाज येण्याचे प्रमाणही वाढते. ब्रेस्टप्रमाणेच निपल्सही वाढतात, ते अधिक काळसर होतात.

3. ब्रेस्टफिडींग

ब्रेस्टफिडिंग करणार्‍या स्त्रियांमध्ये ब्रेस्टच्या वाढीप्रमाणेच निपल्समध्ये जाडसरपणा, क्रॅक्स वाढतात. प्रसुतीनंतर ब्रेस्ट दूधाने भरलेले असते. त्यामुळे ते अधिक जड असतात. काहींना स्त्रियांना ब्रेस्टमध्ये वेदना जाणवतात.

4. गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यांचा शरीरावर काहीवेळेस दुष्परिणामही दिसू शकतो. यामध्ये वॉटर रिटेंशन, वजन वाढणे, ब्लोटींग  अशा समस्या वाढतात. कारण गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये  estrogen आणि progesterone हे हार्मोन्स असल्याने ब्रेस्टच्या आकारामध्ये बदल होतात. वॉटर रिटेंशनमुळे हा त्रास अधिक जाणवतो मात्र हळूहळू ब्रेस्टचा आकार पुन्हा पूर्वस्थितीत येतो. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

5. मासिकपाळी

ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह गोळ्या घेत नसलात तरीही तुम्हांला ब्लोटींग किंवा वॉटर रिटेंशनचा त्रास होतो. मासिकपाळीच्या दरम्यान किंवा आधीही ब्रेस्ट जाड, सुजलेले आणि काहींना वेदनादायी होतात. हे अगदीच सामान्य आहे. हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार झाल्याने ब्रेस्टच्या आकारात वाढ होते. तर progesterone मुळे दूधाच्या ग्रंथींमध्ये सूज वाढते.

6. वाढते वय

मोनोपॉजच्या काळात स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजन पातळी कमी झाल्यानंतर ब्रेस्ट सॅगिंग होण्यास सुरवात होते.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock

Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.

Previous Article

हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर '6' घरगुती उपाय !

Next Article

या '3' घरगुती फ्रुट मास्कने करा सनटॅनच्या समस्येला अलविदा !

Powered by Blogger.