कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलवतील या खास टीप्स !
कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलवतील या खास टीप्स !
कुरळ्या केसांना मऊसूत करण्यासाठी मदत करतील हे घरगुती उपाय
1. एरंडेल तेलाने मसाज करा
एरंडेल तेलाचा तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये समावेश करणे फायदेशीर ठरते. केसांना एरंडेल तेल लावल्याने चमक वाढते. तसेच या तेलामुळे केसांवर मुलायम थर निर्माण होतो. तसेच केस फुलण्याची समस्या कमी होते.
कसा कराल एरंडेल तेलाचा वापर -:
केसांवर एरंडेल तेलाने हलका मसाज करा. केसांना शाम्पू लावण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी या तेलाने मसाज करा. लिव्ह इन कंडीशनरचा वापर करत असल्यास त्यामध्ये एरंडेल तेल मिसळा. एरंडेल तेलामध्ये कोरफडीचा गर, मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांच्या मूळाशी लावा. किमान 15-20 मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.2.अॅपल सायडर व्हिनेगर
किचनपासून तुमच्या ब्युटी किटपर्यंत सार्याच ठिकाणी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. त्यामधील मॉईश्चरायझिंग़ घटक केसांना मऊसूत करतात.
कसा कराल वापर -:
पावणा कप अॅपल सायडर व्हिनेगर आणि पावणा कप पाणी एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावा. 15 मिनिटांनंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.
3.केसांना कोरफड लावा
कुरळ्या आणि फ्रिजी केसांना कोरफड लावल्यास ते सांभाळणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामधील मॉईश्चराईझिंग गुणधर्म अधिक परिणामकारक ठरण्यासाठी त्याचा वापर दह्यासोबत करावा.
कसा कराल वापर
दोन टेबलसपून खोबरेल तेल, चार टेबलसपून कोरफडीचा गर आणि तीन टेबलसपून दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण अर्धातास केसांना लावा त्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. जास्वंदीच्या काही फुलांची पेस्ट करा. त्यामध्ये अर्धा कप कोरफडीचा गर व एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल मिसळा. दहा मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. याकरिता तुम्ही माईल्ड शाम्पूचा वापर करू शकता.Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –MithilaPalkar/Instagram
Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.
Previous Article
कसा बनवाल हेल्दी आणि टेस्टी अननसाचा शिराNext Article
पित्ताच्या त्रासामध्ये 'आंबट फळं' खाणं अधिक त्रासदायक ठरतात का ?
Post a Comment