कसा बनवाल हेल्दी आणि टेस्टी अननसाचा शिरा
कसा बनवाल हेल्दी आणि टेस्टी अननसाचा शिरा
अननसाच्या शिर्याची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी
सण असो किंवा नसो गोड खाण्याची हुक्की आली तर झटपट होणारा एक गोडाचा पदार्थ म्हणजे शिरा.पण त्यामध्येही अनेक पदार्थ मिसळून त्याची चव आणि पौष्टिकता वाढवता येते.
सण असो किंवा नसो गोड खाण्याची हुक्की आली तर झटपट होणारा एक गोडाचा पदार्थ म्हणजे शिरा.पण त्यामध्येही अनेक पदार्थ मिसळून त्याची चव आणि पौष्टिकता वाढवता येते. अननसाचा शिरा हा असाच एक हटके पर्याय आहे.
अननसाचा शिरा अधिक पौष्टीक बनवण्यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा. त्यामुळे शरीराला आयर्नचा पुरवठा होतो. तर अननसामधून व्हिटॅमिन सी मिळते.
अननसाच्या शिर्यासाठी लागणारे साहित्य -:
1 कप अननसाची प्युरी 3 टेबलस्पून गूळ 1 टेबलस्पून तूप 1 कप रवा 1 कप लो फॅट दूध 2 टेबलसपून दूधात भिजवलेले केशर अर्धा टीस्पून वेलची पूडसाहित्य :
कढईमध्ये अननसाच्या पल्पमध्ये 2 टेबलस्पून गूळ मिसळा. हे मिश्रण एकजीव करून मध्यम आचेवर 3-4 मिनिटे एकत्र करा. सोबत हे मिश्रण सतत ढवळत रहा. दुसर्या पातेल्यामध्ये तूपावर रवा खरपूस भाजावा.रवा तांबूस रंगाचा झाल्यानंतर गॅस बंद मंद करावा. उरलेला गूळ मिसळून मिश्रण पुन्हा 1-2 मिनिटांसाठी परतावे. त्यानंतर रव्यामध्ये अननसाचा पल्प आणि दूध मिसळून तयार मिश्रण काही वेळ नीट मिसळून शिजवावे. केशराचे दूध मिसळून शिरा परतवा. यावर आवडीनुसार सुकामेवा आणि बेदाणे मिसळा. शिरा एकजीव झाल्यानंतर गरमागरम सर्व्ह करावा.बाप्पाच्या नैवेद्याला अननसाच्या शिर्याप्रमाणेच हेल्दी आणि हटके मोदकही जरूर बनवा.
Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.
Previous Article
घरात पेस्ट कंट्रोल करण्याचे '6' विविध पर्याय !Next Article
कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलवतील या खास टीप्स !
Post a Comment