Header Ads

किडनीस्टोनबाबत या ’8′ गोष्टी नक्की जाणून घ्या

किडनीस्टोनबाबत या ’8′ गोष्टी नक्की जाणून घ्या
किडनीस्टोनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी या सवयींना तुम्ही दूरच ठेवा.

Fact 1: किडनीस्टोनचा आजार कोणालाही होऊ शकतो.

फक्त वयोवृद्धांना, मोठ्यांना किडनीस्टोनचा त्रास होतो असा काहींचा समज आहे. पण हा त्रास कोणालाही होऊ शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना हा त्रास होऊ शकतो. नक्की वाचा – टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ?

Fact 2 : स्त्रियांपेक्षा पुरूषांना धोका अधिक

किडनीस्टोनचा त्रास स्त्री-पुरूषांना दोघांनाही होतो. परंतू रुग्णांची संख्या पाहता, स्त्रियांपेक्षा पुरूष अधिक असतात. याचा अर्थ असा नव्हे की स्त्रियांना किडनीस्टोन होत नाही. त्यासाठी किडनीस्टोनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Fact 3: काही वेळेस किडनी स्टोनची लक्षण दिसत नाहीत.

किडनीस्टोन लहान स्वरूपात असल्यास सुरवातीच्या टप्प्यात त्याची लक्षण दिसत नाही. किडनीस्टोनमुळे मूत्रविसर्जनाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही. त्याचे निदान केवळ एक्स रे आणि सिटी स्कॅनमुळे होते.

Fact 4: किडनीस्टोनचा त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो

किडनीस्टोनचा आजार पुन्हा पुन्हा पलटू शकतो. पुन्हा किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास त्यामागे किडनीचे कार्य, थायरॉईड, पॅराथायरॉईड, व्हिटॅमिन डी यांचे त्रास असू शकतात.

काहीवेळेस या सार्‍यांचे कार्य, पातळी नियंत्रणात असते. परंतू तरीही पुन्हापुन्हा किडनी स्टोनचा त्रास जाणवतो. त्यामुळे किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. मीठ आणि अ‍ॅसिडीक पदार्थ कमी खावेत. तसेच थायरॉईड ट्युमर, इंफेक्शन यांमुळे किडनीस्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे त्यावर तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास किडनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान वर्षातून एकदा सोनोग्राफी करा.

Fact 5: आहाराचे पथ्यपाणी पाळल्यास तसेच औषधोपचारांनी किडनीस्टोनचा त्रास टाळता येईल .

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी औषधोपचारांसोबत तुम्हांला काही आहारात बदल करणे आवश्यक आहे. मीट ( मांस), कॅल्शियमयुक्त पदार्थ, प्रोसेस्ड फूड, लोणची,पापड यासारखे मीठाचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ प्रमाणात खावेत. कॅल्शियम पूर्णपणे टाळू नका. त्याच्या कमतरतेने इतर अनेक त्रास वाढू शकतात. तुम्ही घेत असलेल्या काही अ‍ॅन्टीबायोटिक्समुळे सतत किडनीस्टोनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यामध्ये बदल करा.

Fact 6: अ‍ॅसिडीक डाएटमुळे किडनीस्टोनचा धोका वाढतो

aerated drinks मध्ये अ‍ॅसिडीक कंटेन्ड अधिक असतो. मूत्र हे अल्कलाईन स्वरूपाचे असते. त्यामुळे आहारात अ‍ॅसिड्चे प्रमाण वाढल्यास मूत्राचे स्वरूपही बदलते. परिणामी किडनीस्टोनचा धोका वाढतो. तुम्ही कोला प्यायल्यानंतर 36 तास ते शरीरात राहते. त्याचा परिणाम मूत्रावर होतो. त्यामुळे जितके जास्त aerated drinks प्याल तितका अधिक त्रास वाढतो.

Fact 7: प्रत्येक किडनीस्टोनला शस्त्रक्रियेची गरज नसते

किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केलीच पाहिजे हा काहींचा समज आहे. परंतू औषधोपचरांनीदेखील त्याचा त्रास कमी करता येतो. किडनीस्टोन  4 मिलीमिटरपेक्षा कमी असल्यास तो औषधोपचारांनी सहज मूत्रावाटे बाहेर पडतो. मात्र किडनीस्टोन 7-8 मिलीमीटरचा असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. किडनीस्टोनचा आकार आणि जागा यावर शस्त्रक्रिया अवलंबून असते. तसेच लॅप्रोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रिकव्हरी लवकर आणि रक्तस्त्राव कमी होतो.

Fact 8: किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी केवळ अति पाणी पिणे हा उपाय नाही.

पाणी पुरेसे न प्यायल्याने किडनीस्टोनचा त्रास वाढतो. हे खरं असले तरीही पाणी खूप प्यायल्याने त्याचा त्रास पूर्णपणे टाळता येईल यामध्ये तथ्य नाही. नियमित 8-10 ग्लास पाणी प्या. किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती पाणी प्यावे?हे देखील नक्की जाणून घ्या.

Image source: Shutterstock

Disclaimer: TheHealthSite.com does not guarantee any specific results as a result of the procedures mentioned here and the results may vary from person to person. The topics in these pages including text, graphics, videos and other material contained on this website are for informational purposes only and not to be substituted for professional medical advice.

Previous Article

मासिकपाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्या घेण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबत या '10' गोष्टी

Next Article

मेरूदंड मुद्रा करा आणि स्ट्रेस फ्री व्हा !
Powered by Blogger.